लातुर रिपोर्टरच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

 लातुर रिपोर्टरच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


औसा(प्रतिनिधी)

 येथील नबी नगर स्थित ऑर्बीट प्री-प्रायमरी शाळेत एम.बी.एम 24 न्यूज चे संपादक मुख्तार मणियार यांच्या वाढदिवसा निमित्त सा.लातूर रिपोर्टरच्या वतीने शाल व पेन देऊन तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांच्या हस्ते एक फोटो फ्रेम देऊन मुख्तार मणियार यांचा सत्कार करण्यात आला.आदर्श नेताचे संपादक जाफर पटेल,लातूर रिपोर्टर चे जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख यांच्याही वाढदिवसा निमित्त लातूर रिपोर्टरच्या वतीने शाल व पेन देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मुस्लिम विकास परिषदेच्या प्रसिद्धीप्रमुख पदी बी.जी.शेख यांची निवड झाल्याबद्दल व वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष पदी इलियास चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही लातुर रिपोर्टरच्या वतीने शाल व पेन देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लातूर रिपोर्टर चे संपादक मजहर पटेल,कार्यकारी संपादक अ‍ॅड.इकबाल शेख यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments