औसा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महाराष्ट्र च्या तालुकाध्यक्ष पदी म. युनूस चौधरी यांची फेरनिवड तर शहराध्यक्ष पदी सुनील उटगे यांची निवड..

 औसा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महाराष्ट्र च्या तालुकाध्यक्ष पदी म. युनूस चौधरी यांची फेरनिवड तर शहराध्यक्ष पदी सुनील उटगे यांची निवड.. एस ए काझी 


औसा प्रतिनिधी : - दि. 30 जानेवारी 2022 रविवार रोजी दुपारी राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील उटगे यांच्या एमआयडीसी परिसरातील उद्योजक कार्यालयात मा.पद्मश्री अण्णा हजारे प्रणीत - भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महाराष्ट्र ची बैठक झाली असून या बैठकीस लातूरचे जिल्हाध्यक्ष हानीफ भाई शेख यांनी औसा तालुकाध्यक्ष पदाची फेरनिवड करत म.युनूस चौधरी यांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला तसेच औसा शहराध्यक्ष पदीची निवड तरुण उद्योजक तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील भीमाशंकर अप्पा उटगे यांची नियुक्ती पत्र देत सत्कार करण्यात आला व नवनियुक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर नवनियुक्त सदस्याचे पत्र देवून सत्कार केला. याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे नुतन जिल्हाध्यक्ष हनिफभाई शेख यांनी आपले मत व्यक्त करत सांगितले की, आपल्या मा. अन्ना हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन (न्यास) महाराष्ट्र च्या संघटनेचे ध्येय व धोरण, कामकाजाबद्दल माहिती देत संघटनेचे कार्यावर प्रकाश टाकला व संघटना वाढीसाठी सर्वांना एकत्रित करून संघटनेच्या कार्य व विस्ताराची गरज आहे सांगितले या बैठकीस न्यास चे जिल्हा सचिव बाशीदखान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किशोर शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष मिटकरी अप्पा, माजी शहरप्रमुख अशोक देशमाने, पत्रकार शमशूल हक काझी (एस ए काझी),वीरभद्र कोपरे,   नंदकुमार देशपांडे, ॲड. म्हेत्रे, भैरोबा ढोक,   हरिभाऊ कुलकर्णी, उमेश बनसोडे, विकास चव्हाण यांच्यासह.आदी जणांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments