गाडवेवाडी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न

 *गाडवेवाडी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न*औसा :- औसा तालुक्यातील  गाडवेवाडी आणि गाडवेवाडी तांडा येथे दिनांक  27 फेब्रुवारी 2022  रोजी पल्स पोलिओ लसीकरण  मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गाडवेवाडी   आणि गाडवेवाडी तांडा येथील अंगणवाडी केंद्र  या बुथवर 0 ते 5  वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात आले, त्यानिमित्ताने गाडवेवाडी येथील पोलिओ बुथचे उद्घाटन  विस्तार अधिकारी नारायण राठोड ,ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे  यांच्या हस्ते करण्यात आले. गाडवेवाडी येथे 54 आणि गाडवेवाडी तांडा येथे जवळपास 62 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका रेखा भारती , मुक्ता राठोड ,शकुंतला चव्हाण, आशा कार्यकर्ती नंदिनी गाडवे, छबाबाई खरोसे ,अंगणवाडी सेविका लताबाई कांबळे ,राजश्री चव्हाण, मीरा राठोड,सुनील गाडवे , विशाल बोमणे , विकास भारती, शिवप्रसाद चिवरे ,विशाल भुसने, महादेव गाडवे, अनिल चव्हाण,अमोल चव्हाण, अविनाश चव्हाण,महेश बोमणे   यांच्यासह गाडवेवाडी आणि गाडवेवाडी तांडा येथील अनेक नागरिकांनी   उपस्थित राहून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments