औशात गुरु रविदास जयंती साजरी

 औशात गुरु रविदास जयंती साजरी 


औसा (प्रतिनिधी) 

संत शिरोमणी गुरु रविदास जयंती समितीच्यावतीने औसा येथील बसवेश्वर गल्ली सांस्कृतिक सभाग्रह मध्ये गुरू रविदास जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औसा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प सदस्य संतोष वाघमारे, ॲड पांडुरंग शिवलीकर, बालाजी साबळे, माधव चित्ते, ॲड संजय सुरवसे, वीरशैव कक्कया समाजाचे राजाप्पा कटके, राजकुमार बनसोडे, कृष्णा सावळकर, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, अविनाश टिके, नेताजी राऊत यांची उपस्थिती होती. गुरु रविदास जयंतीचे औचित्य साधून येथील समाज बांधवांनी सांस्कृतिक सभागृह मध्ये अत्यंत उत्साहात मध्ये जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अफसर शेख म्हणाले गुरू रविदास यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचाराचे आचरण प्रत्येकांनी केल्यास समाजाची प्रगती होते. समाजाने संघटीत होऊन लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे असेही आवाहन अफसर शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री बालाजी बनसोडे, ज्योतीराम सूर्यवंशी, बाळू राऊत, रवी भावले, बालाजी गायकवाड, सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments