औसा येथे चंद्रकांत हंचाटे यांची जयंती साजरी
औसा प्रतिनिधी
औसा नगरपरिषदेचे दिवंगत नगराध्यक्ष तथा संपादक चंद्रकांत नारायणराव हंचाटे यांची 59 वी जयंती साजरी करण्यात आली. नाथ संस्थांचे मच्छिंद्रनाथ महाराज व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे,माजी नगरसेवक प्रा.महमद हनीफ अलुरे, समीर डेंग यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत हंचाटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी सर्वश्री शाम कुलकर्णी, काशिनाथ सगरे विनायक मोरे, शमसुल हक्क काझी, एम बी मनियार, रामभाऊ कांबळे, किशोर जाधव,विठोबा वैजवाडे, महेश अपसिंगेकर ,दिनेश अपसिंगेकर, रोहित हंचाटे, सुरेश हंचाटे, प्रकाश कुसुमकर, प्रेमनाथ खंडागळे, व्यंकटराव काकडे, गणेश क्षीरसागर,मुस्तफा लोहारे,अंबुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments