कर्नाटक येथील हिजाब प्रकरण महाराष्ट्रातील शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केलेल्या घटनेचा राष्ट्रवादी पार्टीचे निदर्शने व धरणा आंदोलन


 कर्नाटक येथील हिजाब प्रकरण महाराष्ट्रातील शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केलेल्या घटनेचा राष्ट्रवादी पार्टीचे निदर्शने व धरणा आंदोलन

औसा प्रतिनिधी

कर्नाटक येथील हिजाब प्रकरण व महाराष्ट्रातील शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या नावाला करण्यात आलेला विरोध केलेल्या घटनेचा निषेध म्हणून दि.14 फेब्रुवारी 2022 सोमवार रोजी तहसिल कार्यालय जवळ संस्कृतीक सभागृहासमोरील मैदानावर निदर्शने व धरणा आंदोलन राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने करण्यात आले. यावेळी उत्तर सोलापूर चे इतिहासकार सरफराज अहमद शेख यांनी टिपू सुलतान विषयी मार्गदर्शन केले.या आंदोलनात आम आदमी पार्टी औसा च्या वतीने जाहीर पाठींबा व सक्रीय सहभाग व तसेच औसा शहर काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर पाठींबा व सक्रीय सहभाग नोंदविला.असुन .या आंदोलनाचे सवीस्तर वृत्त असे कर्नाटकातील उड्डपी येथील पीयू कॉलेज प्रशासन तथा शासन पुरस्कृत इस्लाम धार्मिक परिधान हिजाब ला विरोध करुन मुस्लिम समुदायातील स्त्रीयांचे धार्मिक अधिकारांचे संवैधानिक अधिकारांचे हनन केल्याचे व महाराष्ट्रात शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्याचे घटनेचा निषेध म्हणून दि 14 फेब्रुवारी 2022सोमवार रोजी सकाळी 11 वाजेपासून एक दिवसीय निदर्शने व धरणा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औसा तहसील कार्यालय जवळ संस्कृतीक सभागृहासमोरील मैदानावर शांततामय निदर्शने व धरणा आंदोलन करण्यात आले.यावेळी 14 फेब्रुवारी 2019रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या आंदोलनात आंदोलन करत्यांनी पहले हिजाब फिर किताब कर्नाटक सरकार मुर्दाबाद अशी घोषणा दिली. यावेळी या आंदोलनात आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख, उपशहाराध्यक्ष अली कुरेशी अमीर सय्यद, मिडिया प्रमुख मुख्तार मणियार यांनी सहभाग नोंदविला असुन व तसेच औसा काॅग्रेस कमिटी तर्फे पाठिंबा व सक्रीय सहभाग नोंदविण्यात आले. यावेळी काॅग्रेस कमिटी चे शहराध्यक्ष शकील शेख,मोलाना कलीमुल्ला,खादर सय्यद,हमीद सय्यद,खुंदमीर मुल्ला, अँड फेरोज पठाण,मुज्जमील शेख,खाजाभाई कुरेशी,खाजा शेख,उमर फारुख शेख युवा मंचचे पप्पुभाई शेख,एम आय एमचे सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांचाही या आंदोलनात पाठिंबा व सक्रीय सहभाग नोंदविला होता .

   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, दत्तात्रय कोळपे, जावेद शेख मेहराज शेख, मुजाहेद शेख,भरतं सुर्यवंशी,गोवींद जाधव,सुलेमान शेख,अविनाश टिके,उमर पंजेशा,विनायक सुर्यवंशी, रुपेश दुधनकर,बासीद शेख, महिला व औशाचे नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments