कर्नाटकातील हिजाब प्रकरणी राष्ट्रवादी करणार निदर्शने व धरणे आंदोलन

 कर्नाटकातील हिजाब प्रकरणी राष्ट्रवादी करणार निदर्शने व धरणे आंदोलन 


औसा प्रतिनिधी

 कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरण व महाराष्ट्रातील शेरे हिंद टिपू सुलतान यांच्या नावाला करण्यात आलेला विरोध या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषद सांस्कृतिक सभागृह समोरील मैदानावर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. कर्नाटक राज्यातील उडुपी येथील पियू कॉलेज प्रशासन तथा शासन पुरस्कृत इस्लाम धार्मिक परिधान हिजाब ला विरोध करून मुस्लीम समुदायातील महिलांचे धार्मिक अधिकाराचे संवैधानिक केल्यामुळे आणि महाराष्ट्रात शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता एक दिवसीय निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख यांनी तहसीलदार औसा यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments