महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे उद्या महाप्रसाद

 महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे उद्या महाप्रसाद 


औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व शहरातील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पावन परवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 मार्च रोजी पहाटे पासून मंदिरात महारुद्र अभिषेक व पूजा तसेच भजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .मंदिर समितीच्या वतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शिवभक्तांना महाशिवरात्रीनिमित्त आज दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे .तसेच उद्या दिनांक 2  मार्च रोजी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर शिवभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिर येथे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments