औसा वंचित बहुजन आघाडीचे विरोधक भाजपच :शिवरूद्र बेरुळे

 औसा वंचित बहुजन आघाडीचे विरोधक भाजपच :शिवरूद्र बेरुळे

औसा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवरूद्र बेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह औसा येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वाचा विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्याअनुषंगानेआज दिनांक 23 फेब्रुवारी 2022 बुधवार रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेत ब-याच प्रभागांमध्ये विकास कामे दिसुन आलेले नाहीत व काही ठिकाणी कामे चालू आहेत.त्या कामाचा सुध्दा आढावा आम्ही घेणार आहेत.कुठल्या प्रभागातील कामे झालेली आहेत,व कुठल्या प्रभागात कामे झाली नाहीत अशी पूर्ण चोकशी आम्ही करणार आहोत.आणि वंचित बहुजन आघाडी औसा नगर परिषदेत संपूर्ण वार्डामध्ये उमेदवार देऊन निवडणूक लढविणार असल्याचे येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक वार्डात मोठ्या ताकदीने निवडणूक लढविणार व या निवडणुकीत आमचा विरोधक भाजप आहे.आणि आमच्या निवडणुकीत भाजपच टार्गेट राहणार आणि 


आम्ही प्रत्येक वार्डात उमेदवार देऊन निवडणूक लढविणार असे  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवरूद्र बेरुळे यांनी  पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुभाष भालेराव, शहराध्यक्ष इलियास चौधरी, कायदेशीर सल्लागार गजेंद्र गीरी,विलास तपासे आणि पत्रकार उपस्थित राहिल्या बद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इलियास चौधरी यांनी सगळयांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments