अपंग जनता दल सामाजिक संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन

 अपंग जनता दल सामाजिक संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन


देण्यात आले---------------------------------- अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली लातूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी लातूर महानगर पालिका आयुक्त मा‌.  श्री.  अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातील मागण्या 1 लातूर शहरातील दिव्यांग बांधवांना व्यवसाय साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. 2. महानगर पालिका 5% निधी प्रति वर्षी खर्च करण्यात यावा अथवा दिव्यांगाच्या खात्यात त्वरित वितरित करण्यात यावा.3. लातूर शहरातील वंचित दिव्यांग बांधवांना शिल्लक राहिलेले साहित्य त्वरित दिव्यांगांना देण्यात यावे. 4. दिव्यांगांच्या आरोग्यासाठी मोफत रुग्णवाहिका व आरोग्य तपासणी सोयसुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. लातूर शहरातील दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी  निवेदन दिले . यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी होते.  अपंग जनता दल सामाजिक संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष सौ. पुजा सर्जे.   श्री. शमशोधीन तांबोळी. (लातूर शहराध्यक्ष)  श्री. सुर्यकांत पवार (लातूर जिल्हा उपाध्यक्ष) श्री. भिमराव यादव (लातूर तालुका अध्यक्ष) श्री . पृथ्वीराज शिंदे. (देवणी तालुका अध्यक्ष) श्री.  नुरखान पठाण (रेनापुर तालुका अध्यक्ष) श्री. यशवंत मोरे (औसा तालुका अध्यक्ष) या सर्व पदाधिकाऱ्यांच्य निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments