*जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी*
*प्रभागांच्या संख्या निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत*
*लातूर* (dny):- राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 27 जानेवारी 2022 अन्वये माहे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पूढील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभांगांच्या सीमा निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत केलेला आहे.
तालुका व ग्रामपंचायत संख्या पूढील प्रमाणे आहे.- लातूर तालुक्यातील -44, रेणापूर तालुक्यातील -37, औसा तालुक्यातील -60, निलंगा तालुक्यातील -68, शिरुर अनंतपाळ-15, देवणी तालुक्यातील-9, उदगीर तालुक्यातील-26, जळकोट तालुक्यातील-13, अहमदपूर तालुक्यातील-43 व चाकुर तालुक्यातील-46 असे एकूण 361 ग्रामपंचायतींची संख्या आहे.
प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना-ब) संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांचेमार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्दी देवून हरकती मागविण्यात येणार आहेत. या 361 ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेस हरकती दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ते 4 मार्च 2022 या कालावधीत संबंधीत तालुक्याचे तहसिल कार्यालयामध्ये सादर करता येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
1 Comments
Find all the info and tips from the casino experts.
ReplyDeleteThe Casino Experts 군포 출장마사지 Directory for 2021 includes all the 서귀포 출장안마 Casino 세종특별자치 출장마사지 Experts' ratings, reviews, complaints, & more. Use our 부산광역 출장샵 detailed casino 인천광역 출장샵 rating tool to see