प्रा.शा.बुधोडा येथे महिला शिक्षणदिन उत्साहात साजरा

 *प्रा.शा.बुधोडा येथे महिला शिक्षणदिन उत्साहात साजरा*


औसा प्रतिनिधी

 आज दि.03 जानेवारी 2022 रोजी जि.प.प्रा.शा. बुधोडा येथे  क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती *महिला शिक्षणदिन* म्हणून साजरी करण्यात आली.

प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पवार मॅम व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून  *सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा* अभियानाची सुरुवातही  करण्यात आली.

महिला शिक्षण दिनानिमित्ताने विदयार्थांनी सर्व शिक्षक शिक्षिकांचा व उपस्थित श्री.राम कोलपाक,श्री. शिवराम सुरवसे यांचा गुलाबपुष्प देवून सन्मान केला.

      आजच्या दिनाचे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे श्रीमती भारत कांबळे यांची श्री.प्रभाकर हिप्परगे सरांनी प्रकट मुलाखत घेतली.

         तसेच यावेळी कु. आश्विनी,रुद्राणी,स्वराली,श्रावणी,साक्षी,गायत्री,शुभांगी,ओमकार... आदी विदयार्थांची भाषणे झाली.

        ज्या मुलींनी *बालिकादिन* म्हणून सावित्रीची वेशभूषा केली होती त्यांचे मू.अ.नी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

        या अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे देखणे  सूत्रसंचालन श्री.युवराज घंटे सरांनी केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सुंदर सांगता केली.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती कच्छवा,स्वामी,साबदे,गठ्ठडे मॅमनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments