श्री मुक्तेश्वर विद्यालायात विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण संपन्न
औसा प्रतिनिधी
राज्यात 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरु केले असून औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयात 416 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे
जगात ओमीक्रॉन कोरोना व्हेरिएंटच संकट घोंघावत असल्याने 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे यात औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयातील 416 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे यावेळी आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद कदम, डॉ स्मिता फडवीस, डॉ संजय मस्के, डॉ सुमित शेट्टी, डॉ श्यामसुंदर नलगोंडे, डॉ संध्या जाधव, सुमन केंद्रे, रविना कांबळे, शीतल वांगे, सुनीता जाधव, श्रीनिवास मुदगडे, नरसिंग रणदिवे, सचिन म्हेत्रे, सागर गरड यांनी लसीकरण कामात अनमोल कार्य केले आहे
यावेळी संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, सचिव डॉ बसवराज पटणे सहसचिव प्रभूप्पा माशाळे रविशंकर राच्चट्टे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला एकूण पात्र शालेय विद्यार्थ्यांना 100 % लसीकरण करण्यात आले आहे या लसीकरण मोहिमेत मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे, रमेश वर्मा, इलाही कोतवाल यांच्यासह सर्व शिक्षकवृंदानी अधिक परिश्रम घेतले आहे.
0 Comments