औसा शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर पाणी व होत असलेले घाणीचे साम्राज्य दूर करावे-एम आय एम ची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर पाणी व होत असलेले घाणीचे साम्राज्य दूर करावे या मागणीसाठी आज दिनांक 4 जानेवारी 2021 मंगळवार रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदन सादर केले.या निवेदनात सविस्तर वृत्त असे औसा शहरातील मुख्य रस्ता बाजार पेठेत बांधकाम सुरू आहे. त्यालगत रस्त्यावर पाणी सोडून शहरातील जनतेला ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. तसेच शहरातील हनुमान मंदिर ते खादी भंडार पर्यंत मुख्य रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी वाल फुटून पाणी रस्त्यावर जात आहे. त्या ये-जा करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका अध्यायात लक्ष देत नाही व घरकुल योजने अंतर्गत काम करण्यासाठी आपली घरे रिकामे करून लोकांनी रस्त्यावर घरे थाटली आहे व अतिक्रमण करून बांधकाम करण्यात येत आहे. सर्व शहरातील मुख्य रस्त्यावर होत असलेले घाणीचे साम्राज्य दृष्ट करण्यात यावे यासाठी नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही काम करण्यात येत नाही तरी सध्या प्रशासक नेमणूक झालेले आहे तरी सन्माननीय मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्त्यावरील पाणी व अतिक्रमण तसेच शहरातील विविध समस्या वर लक्ष देण्यात यावे व जनतेला होत असलेले त्रास दूर करण्यात यावे या मागणीचे निवेदन एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर इनामदार यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना सादर केले आहे. या निवेदनावर सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments