जुने नप शापीग कॉम्प्लेक्स फेरलिलावची मागणी
औसा नगरपालिका मिळकत /जागा वाटप नियमावली 2018 नुसार नगरपरिषदेची बसस्टँड समोरील व जुन्या नगरपरिषद समोरील दुकान गाळयांची व्यापारी संकुल निहाय अनामत रक्कम व भाडे विहित मुदतीत एक महिन्याच्या आत भरले नसल्यामुळे व 500 रुपयांच्या बाँडवर सदर अटी व शर्ती मान्य असल्याबाबत नपला लेखी कळविले नसल्यामुळे, सदर गाळ्यांचे लिलाव करण्याबाबत औसा शहरातील काही व्यापारी निवेदन दिलेले आहे तसेच त्यांची दुसरी मागणी अशी आहे की औसा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव दिनांक 16.04.2018 विषय क्रमांक 16 नुसार, सदर औसा नगरपालिका मिळकत/ जागावाटप नियमावली 2018 बाबत व अंमलबजावणीस रोक दिल्यामुळे व महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 92/ 3 नुसार सदरची आणि जिल्हाधिकारी यांची कारवाई अवैध असल्याबाबत त्यांनी निवेदनात नमुद केले आहे तसेच जागा वाटप रजिस्टर क्रमांक 159 नावे श्री शेख मुजम्मिल शेख अहमद यांनी नगरपरिषद पार्किंग जागेच्या रस्त्यावरील अनधिकृतपणे गाळा उभारलयाबाबत व सदर जागेची नोंद रद्द करून सदर जागा अग्निशमन वाहन व सफाई पार्किंगसाठी मोकळी करणे बाबत जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिले गेले आहे निवेदनात म्हटले आहे की सदरील लोक ही औसा शहराची नागरिक असून औसा नगरपालिकेने नगर परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 29 दिनांक 3 10 2017 च्या ठरावाद्वारे वर नमूद ठिकाणची गाळे हे नियमानुसार फेरलिलाव करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार त्यांना कोणत्याही परिस्थितीत सदर नऊ वर्षाच्या नंतर मुदतवाढ देता येत नाही तरी परंतु औसा नगर परिषद मिळकत/ जागावाटप नियमावली 2018 बनवून,सदर गाळे धारकांना नियम व अटी सह मुदतवाढ देण्यात आली, ते पूर्ण चुकीचा आहे, सदर अटी व शर्ती मध्ये नमूद तारखेत सुद्धा सदर गाळेधारकांनी विहित मुदतीत बाॅड व अनामत भाडे भरलेले नाही जे की जागावाटप नियमावली मधील तरतुदी विरोध आहे तरी या गाळयांची फेर लिलाव करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम नुसार सदर जिल्हाधिकारी यांनी बनवलेली औसा नगरपालिका मिळकत/ जागावाटप नियमावली ही अवैध आहे तसा अधिकार केवळ राज्य शासनास आहे असे निवेदनात नमूद आहे
या अर्जातील विषय क्रमांक 3 मध्ये जागा भाडे श्री शेख मुजमील हे गाळेधारक, सदर जागा रजिस्टर व व क्र 159 वर आपले नाव कसे लावून घेतले याची चौकशी करून सदर नाव रद्द करावे तसेच औसा नगरपरिषद मिळकत जागावाटप नियमावली 2018 मध्ये ही यांचे नाव नसल्याचे कारणावरून ही व न प पार्किंग आरक्षण जागेस जाण्यासाठी रस्त्यावर असलेले व अवैधपणे अतिक्रमण केलेले ही जागा रिकामी करून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा.हा रस्ता हा नगरपरिषद पार्किंग जागे सोबत या ठिकाणी असलेल्या अग्निशमन केंद्रास फार उपयोगी आहे व भविष्यात शहरात व परिसरात आगीची घटना दुर्दैवाने घडल्यास हा रस्ता असणे आवश्यक आहे, हा रस्ता पूर्वीपासून अस्तित्वात होता असे निवेदनाची नमूद आहे तरी या सर्व मागण्यांचा विचार सकारात्मक करण्यात यावा व गाळेधारकांस न्याय द्यावा अन्यथा मा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची येईल असे निवेदन सही करणार औसा नगर परिषद आरक्षण क्रमांक 18 शॉपिंग कॉम्प्लेक्स व तहसील शेजारील नूतन शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळेधारक, ज्यामध्ये पांडुरंग इलेक्ट्रिकल्स, विनायक मोरे, बाप्पा कठारे, परवेज शेख, राजकुमार नरसिंग औटी, यासह अन्य जणांचा समावेश आहे
0 Comments