पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी

 पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी


नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी



निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना केल्या सूचना


लातूर प्रतिनिधी रवीवार दि. ३० जानेवारी २२:


  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज रविवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.


  यावेळी काँग्रेसचे सचिन दाताळ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे एन.डी. सोनकांबळे, कवयित्री उषा भोसले, चंद्रकांत बरचे, दगडू माने, वसंत सपाटे, मधुकर गव्हाणे, गोवर्धन महाळे, हनमंत सपाटे, गजानन सपाटे, दिनकर ढेकणे, गरसुळी सोसायटीचे चेअरमन सतीश पाटील, पंकज देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments