रामनाथ विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 रामनाथ विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील आलमला येथील श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 3 जानेवारी 2022 सोमवार रोजी विद्यालयात क्रांतिबाई सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कुमारी व्हनाळे जागृती या मुलीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील एक कविता सादर केली. तसेच कुमारी नोबदे समीक्षा या मुलीने क्रांती बाई ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण केले. या कार्यक्रमात असंख्य मुला-मुलींनी ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यालयात आगमन केले होते. या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सूर्यवंशी भास्कर,सौ जय मंगल हिंगण,सौ सुनंदा निलंगेकर, सौ उकरडे दिपश्री यांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आवटे ए आय तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

1 Comments

  1. How To Play Baccarat - Play Free Online Baccarat Online
    Baccarat is a popular casino game played by two separate teams, typically consisting of two players. The game is played in 피망 바카라 pairs with two

    ReplyDelete