लातूर जिल्ह्यातील औसा आगाराची धावली पहिली बस
औसा (सा.वा.)दि.12
संपुर्ण राज्यातील एसटीचे चालक-वाहक हे गेल्या 45 दिवसापासून आपल्या विविध मागणीसाठी आंदोलने करीत असतांना लातूर जिल्ह्यातील औसा आगाराची बस क्रमांक एम. एच. 20 बीएल 1337 आज रविवार दिनांक 12/12/2021 रोजी औसा बस स्थानकातून सकाळी 10.00 वा. औसा-लातूर अहमदपूर साठी रवाना झाली आहे.
राज्य शासनाने एसटीचे कर्मचारी यांच्या अनेक मागण्या मान्यही केलेल्या आहेत. परंतू केवळ एका मागणीसाठी गेल्या 45 दिवसापासून संपावर असल्याने एसटीचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. आणि लातूर जिल्ह्यातील औसा आगारातील पहिली बस औसा-लातूर अहमदपूर साठी रवाना केलेली असून मी स्वः व माझे सहकारी आम्ही बस सोबत जाणार असून औसा पाठोपाठ आजच निलंगा आगाराच्याही कांही बसेस धावणार असल्याचे लातूर जिल्ह्याचे वहातूक विभाग नियंञक सचिन क्षिरसागर यांनी दै. सामनाशी बोलतांना माहिती दिली.
औसा आगारातून सकाळी 10.वा. निघालेली औसा-लातूर अहमदपूर या बसने स्वतः
वहातूक विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर , विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख , सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक धात्रक , आगार व्यवस्थापक अजय गायकवाड , यांनी बसने प्रवास केला. यावेळी बस चालक साठे , वाहक बिरादार यांनी सर्व प्रथम पुढे येऊन औसा आगाराची बस रवाना केल्याने त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे.
यावेळी औसा येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष भागवत गायवाड, रामभाऊ जोगदंड, व्यंकट साठे, चंदू गवळी, मुजीब शेख, गरड ईत्यादीजणांनी यावेळी वाहक व चालक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments