शिरूर आनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक

 शिरूर आनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक


 शिरूर आनंतपाळ प्रतिनिधी

 शिरूर आनंतपाळ नगरपंचायतीची सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी आढावा बैठक घेतली .या निवडणुकीमध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक संपन्न होण्यासाठी एकूण प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र छाननीनंतर वैध ठरलेले नामनिर्देशन पत्र व इतर बाबींचा संपूर्ण आढावा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी घेतला. एकूण 17 जागेपैकी चार जागेवर इतर मागास प्रवर्गातील उमेदवार यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. परंतु महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 7 डिसेंबर रोजी च्या पत्र अन्वये इतर मागास प्रवर्गातील आरक्षण रद्द झाल्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील चार जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता या ठिकाणी 13 जागेवर निवडणूक होत असून 13 जागेसाठी एकूण बत्तीस नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. या आढावा बैठकीमध्ये औसा रेनापुर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अतुल जटाळे मुख्याधिकारी मंगेश शिंदे पोलीस निरीक्षक अंगद सुडके गट विकास अधिकारी विजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 13 जागेसाठी एकूण 13 मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा तसेच संवेदनशील मतदारसंघ इत्यादी बाबींचा आढावा जिल्हाधिकारी महोदयांनी घेऊन निवडणूक प्रक्रिया बद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments