शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर आपचूंदा येथील खंडित वीजपुरवठा चालू करण्याचे आश्वासन
औसा प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून बिल वसुलीसाठी आपचूंदा गावातील शेती पंपाचा विजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. पिकांना व जनावरांना पाणी देण्यासाठी अडचण होती.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते.परंतू शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी ही विज बील वसुली बेकायदेशीर असून शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही.आधी २४ तास उच्च दाबाचा विजपुरवठा करा मगच वसुली करा.अन्यथा शेतकरी संघटना कार्यालयास कुलूप ठोकेल असा इशारा दिल्यानंतर लगेच महावितरणचे अभियंता श्री.माने यांनी लगेच विजपुरवठा चालू करण्याचे आश्वासन दिले.यावेळी युवा नेते विवेक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वसंत कंदगुळे, शाखाध्यक्ष दत्तात्रय पाटील, अजिंक्य पाटील,मल्लीनाथ कात्रे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments