रब्बी पिके पदरात घेण्यासाठी शेतकऱ्यांची आंतरमशागतीची धावपळ सुरू

 रब्बी पिके पदरात घेण्यासाठी शेतकऱ्यांची आंतरमशागतीची धावपळ सुरू औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके पदरात पाडून घेण्यासाठी आंतर मशागती करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. औसा तालुक्यामध्ये या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच रब्बी ज्वारी, गहू, सूर्यफूल, करडई आणि उन्हाळी मूग यासह इतर पिकांची लागवड झालेली असून शेतकरी सध्या कोळपणी खुरपणी करून शेतातील पिकाचे कीड रोगांपासून रक्षण करण्यासाठी फवारणी करणे व पिकाचे अंतर मशागत करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. रब्बी पिकाच्या एकूण लागवड योग्य क्षेत्रापैकी सुमारे 70 टक्के क्षेत्रावर औसा तालुक्यामध्ये हरभरा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे . वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकाला फटका बसला आहे. यावर्षी रब्बीचे ही उत्पन्न घटणार असून खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उडीद मूग पिकांचे नुकसान झाले होते. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे व शतक सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर आळ्या पडत असून ज्वारी व गहू पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे

Post a Comment

0 Comments