नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाचा जाहीर लीलाव करण्याची एम आय एम पक्षाची मागणी


 नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाचा जाहीर लीलाव करण्याची एम आय एम पक्षाची मागणी 


औसा (प्रतिनिधी) औसा नगर परिषदेच्या वतीने शहरातील नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाच्या आवारात नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचा जाहीर लिलाव दिनांक २३ नोव्हेंबर पासून ई लिलाव ऑनलाइन पद्धतीने सुरुवात करण्यात आला आहे. परंतु सदर लिलावात नगरपालिकेच्या वतीने बेकायदेशीर रीत्या जाचक अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला सदर लिलावात भाग घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. नगरपरिषदेच्या सदरील गाळ्याचं ऑनलाईन पद्धतीने लिलाव घेतल्यास त्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरचा लिलाव जाहीर लिलाव पद्धतीने केल्यास यामध्ये पारदर्शकता येऊन सर्वसामान्य जनतेला भाग घेण्यास सोयीस्कर होणार आहे. सदर दुकाने हे जनतेच्या हितासाठी असून नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाच्या आवारातील व्यापारी संकुलाचा लिलाव हा जनतेच्या हिताविरुद्ध होत असल्यामुळे हा लिलाव नगरपरिषदेने घालून दिलेल्या बेकायदेशीर अटी जनतेस मान्य नाहीत त्यामुळे ई लिलाव पद्धत बंद करून नवीन अटी व नियमाप्रमाणे व्यापारी संकुलाचा जाहीर लिलाव ऑफलाइन पद्धतीने घ्यावा अशी मागणी एम आय एम पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments