विकास कामे सर्व साधारण सभेत मंजूर करून घ्यावे:एम आय एमची मागणी

 विकास कामे सर्व साधारण सभेत मंजूर करून घ्यावे:एम आय एमची  मागणी


औसा प्रतिनिधी

औसा शहरातील विकास कामे सर्व साधारण सभेत मंजूर करून घेण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 27 डिसेंबर 2021 सोमवार रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदन सादर केले आहे.या निवेदनात सविस्तर वृत्त असे मुख्याधिकारी नगरपरिषद औसा आपण मला दि.08/12/2021रोजी माझ्या निवेदनावर आपण आंदोलन करु नका म्हणून नोटीस देण्यात आली होती.मी तिस-या टप्प्यासाठी रास्ता रोको आंदोलन केला व तसेच20/12/2021 रोजी मी आपल्या तिसऱ्या टप्यासंदर्भात शासनाकडुन 5 कोटी निधी आलेला त्या निधीतून खर्च करता येत नाही असे म्हणून आपण मला दि.23/12/2021 रोजी नोटीसद्वारे आंदोलन करण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली.

जामा मस्जीद ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता विकास काम निधीमधुन करुन जनतेला होत असलेला त्रास दूर करण्यात यावा.आपण मला दोन वेळा नगरपालिकेला आंदोलन न करुन सहकार्य करण्याबाबत पत्र दिले आहे.त्या अनुषंगाने मी माझा गाढव मोर्चा काढण्याचा निर्धार मला नगरपालिका प्रशासनावर किंवा आपल्यावर काही दिवसांसाठी विश्वास ठेवावे लागेल.

तरी मुख्याधिकारी यांना व नगराध्यक्ष व कॉन्सिल यांना विनंती करतो की, उद्या होणा-या 28  डिसेंबर मंगळवार रोजी शेवटच्या सर्व साधारण सभेमध्ये तिसरा टप्पा या संदर्भात विषय ठेवून चर्चा करून ठराव मंजूर करून तो निधी आणून रस्ता मोठा करण्यासाठी प्रयत्न करावा.या मागणीचे निवेदन एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी यांना  सादर केले आहे.

Post a Comment

0 Comments