माझं लातूर आणि विलासराव देशमुख शासकीय संस्थाच्या वतीने नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
लातूर प्रतिनिधी
माझं लातूर व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात 240 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात 143 व्यक्तींना मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. माझं लातूर व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने आज रविवार दिनांक पाच डिसेंबर रोजी येथील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील नागरिकांसाठी सकाळी 9 ते 2 या वेळेत नेत्रतपासणी शिबिर राबविण्यात आले या नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अँडवोकेट व्यंकट बेद्रे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, अँडवोकेट बळवंत जाधव, विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय महाविद्यालयाचे अधिष्ठाता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख, नेत्रतज्ञ श्रीधर पाठक यांच्यासह माझं लातूर परिवाराच्या सदस्याची यावेळी उपस्थिती होती. या नेत्रतपासणी शिबिरात 240 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात 143 व्यक्ती यांना मोतिबिंदू आजार झाल्याचे निदान झाले. त्यांची प्राथमिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. हे शिबिर सकाळी नऊ ते दोन या वेळेत राबविण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी माझं लातूर परिवाराचे कोअर कमिटीचे सदस्य सतीश तांदळे, अभय मिरजकर, दीपरत्न निलंगेकर, प्रमोद गुडे, काशिनाथ बळवंते, अँडवोकेट प्रदीप मोरे, सिताराम सोनवणे, तम्मा पावले, गोपाळ झंवर, संजय स्वामी, अशा आयाचीत, इमरान सैय्यद, उमेश कांबळे, दत्तात्रय परळकर, वामन पाठक यांच्यासह सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
0 Comments