उदगीर ग्रामीण रुग्णालयातील कंपाउंडर सचिन राजमाने याला सेवेतून तात्काळ निलंबित करा जय महाराष्ट्र सेनेची मागणी

 उदगीर ग्रामीण रुग्णालयातील कंपाउंडर सचिन राजमाने याला सेवेतून तात्काळ निलंबित करा जय महाराष्ट्र सेनेची मागणी


औसा प्रतिनिधी

उदगीर ग्रामीण रुग्णालयातील कंपाउंडर सचिन राजमाने यांनी विनयभंग केला व त्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी 16 डिसेंबर 2021रोजी जिल्हा शैल्य चिकित्सक लातूर यांना जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सविस्तर वृत्त  असे उदगीर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेवर रात्री तपासणीच्या कारणाने ओपीडी मध्ये बोलावून विनयभंग करणाऱ्या कंम्पांऊडर सचिन राजमाने वर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तरी त्याला तत्काळ सेवेतून निलंबित करावे व अशाप्रकारे या व्यक्तीने अनेक महिलांचा विनयभंग केलेला आहे. त्याची सखोल चौकशी करावी.व त्याला तत्काळ निलंबित करावे.यामागणीचे निवेदन जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हा शैल्यचिकित्सक लातूर यांना निवेदन सादर केले आहे.यानिवेदनावर जय महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष जे पी औसेकर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments