श्रम गंगेच्या काठावरती ऊसतोड कामगारांची वस्ती

 श्रम गंगेच्या काठावरती ऊसतोड कामगारांची वस्ती 


औसा प्रतिनिधी

औसा- सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम विजयादशमीच्या मुहूर्तावर साखर कारखान्याचे बॉयलर प्रदीपन केल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होतो. नोव्हेंबर ते जून सहा ते सात महिने ऊस तोड कामगार अतिशय हलाखीचे जीवन कंठत वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा सामना ऊसतोड कामगारांना करावा लागतो.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे फड बदलत दर आठ पंधरा दिवसांनी मधून त्यांना आपल्या राहत्या बदलून वस्तीला जावे लागते.पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोड कामगार अनेक हाल अपेष्टा सहन करीत नैसर्गिक संकटाचा सामना करीत आपले जीवन जगतात म्हणून ऊसतोड कामगाराची हंगाम सुरु असून औसा तालुक्यातील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना व गोंद्री येथील श्री साईबाबा सुगर्स हे दोन साखर कारखाने सुरू आहेत मांजरा परिवाराच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखाने चालू करण्यात आले असून ऊसतोड कामगाराची कडाक्याच्या थंडीमुळे मात्र दैना उडाली आहे.

अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे ऊसतोड कामगारांची धावपळ सुरू असून वातावरणातील गारठ्यामुळे ऊसतोड कामगारांना आतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.टीचभर पोटासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोड कामगार उसाच्या फडावर आपल्या राहुट्या टाकून दिवसभर काबाडकष्ट करून राहतात.ऊन,वारा आणि पाऊस याची पर्वा न करता ऊस तोड कामगार हे कष्टकऱ्यांचे वास्तव जीवन जगतात.लहान मुला बाळासह आपला परिवार कडाक्याच्या थंडीमध्ये राहून त्यामध्ये सांभाळ करीत दिवसभर काबाड कष्ट करून घाम गाळून वस्ती सर्व गंगेच्या काठावरती आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तर रात्री-अपरात्री ट्रॅक्टर आणि उसाचा ट्रक आल्यानंतर उसाच्या मोळ्या ट्रक ट्रॅक्टर मध्ये भरून द्यावे लागतात.

Post a Comment

0 Comments