ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव
औसा प्रतिनिधी
मागील चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि वातावरणातील गारठा पसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिकावर आळी यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तसेच रब्बी ज्वारीची पाने कुरतडली जात आहेत. हरभरा पिकावर लहान व मोठ्या आकाराच्या आळा मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. परिणामी हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याने दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस व गारा पडण्याचे संकेत दिले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भाजीपाला व फळबागा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे .द्राक्षबागा, आंबा, पेरू, चिकू तसेच अन्य फळबागाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. वातावरणात गारठा पसरल्यामुळे शेतकरी शेतमजुरांचे शेतावर काम करत असताना मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नैसर्गिक संकटाची जणू मालिकाच सुरू असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
0 Comments