*सनराईज इंग्लिश स्कूलच्या फैज मुजावरची राष्ट्रीय स्तरावरील म्युझीकल चेअर अॅन्ड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

 *सनराईज इंग्लिश स्कूलच्या फैज मुजावरची राष्ट्रीय स्तरावरील म्युझीकल   चेअर अॅन्ड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड


*

 नुकत्याच परभणी येथे झालेल्या १५ व्या राज्यस्तरीय म्युझीकल   चेअर अॅन्ड स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावत सनराईज इंग्लिश स्कूल, लातूर. इयत्ता १ ली चा विद्यार्थी फैज रियाज मुजावर याने ७-९ या वयोगटात कांस्यपदक मिळविले.

लातूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, लातूर अंतर्गत लातूर स्केटिंग स्कूल मध्ये प्रशिक्षक मो.अहेमद सर व सय्यद लायकसर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

७५ वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त ही स्पर्धा महाराष्ट्र म्युझीकल चेअर असोसिएशन यांच्या द्वारे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे फैज मुजावर या खेळाडूचे  जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये पणजी (गोवा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील म्युझीकल चेअर अॅन्ड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर यश संपादन केल्यामुळे सनराईज इंग्लिश स्कूल, लातूर चे संस्थाचालक राजेंद्र कोळगे, प्राचार्या शीतल पाटील, ओ.स. रमेश बेळंबे, वर्गशिक्षिका ज्योत्स्ना पाटील, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments