अहेमदनगर तालुक्यातील मौजे जेऊर येथील महेदवी कब्रस्तान च्या दोन गुंठे जागेपैकी एक गुंठा जागेचा अपहार


 अहेमदनगर तालुक्यातील मौजे जेऊर येथील महेदवी कब्रस्तान च्या दोन गुंठे जागेपैकी एक गुंठा जागेचा अपहार 

एल.एम.एम.ग्रुप कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार;महसूल विभागातील दोषींवर कारवाई करून कमी केलेली एक गुंठा जागा परत करण्याची मागणी

अहेमदनगर (प्रतिनिधी) -  तालुक्यातील मौजे जेऊर येथील हज़रत बीबी भिका (रजी.) यांचा दर्गा शरीफ असून तो सर्व्हे क्रमांक १३७१ मध्ये आहे. त्याची महेदवी मुस्लीम स्मशानभूमी या नावाने महसूल विभागात नोंद आहे. महसूल नोंदीनुसार या जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजेच बीबी भिका यांची दर्गा शरीफ २००३-२००४ पर्यंत २ गुंठे (२००० चौ. फूट) होती. परंतु ती आता केवळ एक गुंठाच शिल्लक राहिली आहे. मग बाकी ची 1 गुंठा जागा कुठे गेली ? अशी विचारणा एल.एम.एम.ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दीलावर उर्फ़ फ़र्रूख़ यांनी ई-मेल द्वारे  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून अपहार करण्यात आलेली एक गुंठा जागा परत करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुस्लीम महेदवीया समाजाचे संस्थापक इमामुना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद (अलै.) यांच्या पत्नी उम्मुल-मुसद्दिकीन हज़रत बीबी भिका (रजी.) यांच्या मृत्यूनंतर मौजे जेऊर येथे दफन करून दर्गा बांधण्यात आला आहे. ज्या ठिकाणी दर्गा आहे तिथे काही वर्षांपूर्वी दर्गा ची जागाही दोन गुंठे होती. मात्र काही वर्षांपूर्वी दोन गुंठे असलेली दर्गा ची जागा एक गुंठा कमी करून एकच गुंठा कशी काय लावण्यात आली ? अशी विचारणा एल.एम.एम. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दीलावर उर्फ़ फ़र्रुख़ यांनी अहेमदनगर च्या जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली असून येथील दर्गा च्या जागेत अनागोंदीपणे  करण्यात आलेल्या  जमिनीच्या फेरफार नोंदीत  तातडीने आवश्यक दुरुस्त्या करून या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर आवश्यक ती कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत आणि दर्गा ची एक गुंठा कमी केलेली जागा परत दर्गा च्या नावे लावण्यात यावी व एकूण दोन गुंठे दर्गा ची जागा परत करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. 


आपला



एस.एम.युसूफ़ ( *मुक्तपत्रकार*)

 *जिल्हाध्यक्ष* - एल.एम.एम.ग्रुप, बीड.

 *सचिव* - जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड.

 *पत्ता* - आसेफ़नगर, जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागे, अकबर किराणा दुकान गल्ली, बीड.

संपर्क - *9021 02 3121.* 

मा. संपादक साहेब

दैनिक - ..............

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी हि नम्र विनंती.

🙏धन्य✍️वाद🙏

Post a Comment

0 Comments