श्री मुक्तेश्वर मंदिर कलशारोहन वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सव..

 श्री मुक्तेश्वर मंदिर कलशारोहन वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सव.. 



औसा/ प्रतिनिधी : - औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय समितीच्या वतीने 

 कलशारोहन सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर समितीच्या वतीने दि. 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सव श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त ह भ प शिवलीलाताई पाटील बार्शी ज्ञानेश्वरी ताई बागुल नाशिक आणि रूपालीताई सवणे परतुर यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे.

ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 6 :00 ते 9 : 00 या वेळेत भव्य कीर्तन महोत्सव होणार असून या महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील ख्यातनाम महिला कीर्तनकारांचे किर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. मुक्तेश्वर वागदरे अध्यक्ष श्री मुक्तेश्वर देवालय समिती औसा व मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments