मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने सोनाली गुळभिले यांचा सत्कार

 मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने सोनाली गुळभिले यांचा सत्कार 


औसा प्रतिनिधी

 औसा येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने कलशारोहन सोहळ्याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित किर्तन महोत्सवामध्ये औसा शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अकरा महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये चांगभलं सेवाभावी संस्थेच्या सोनाली गुळभिले यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर ऐश्वर्या, डॉक्टर सौ जगताप मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे, धनंजय कोपरे, उमाशंकर मुरगे, रविशंकर राचट्टे, प्रकाश वाघमारे, ॲड भीमाशंकर कारंजे, प्राप्त युवराज हलकुडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments