चलबुर्गा सोसायटीमध्ये जय सहकार ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील चलबुर्गा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बब्रुवान मोरे आणि काशिराम परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली जय सहकार ग्रामविकास पॅनेलने सर्व 11 जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे भीमाशंकर विठ्ठल चव्हाण, सुरेश मारुती टोम्पे, प्रताप पंडितराव परीहार ,गोपाळ तुळशीराम मुगळे ,दगडू तुळशीराम मोरे ,धोंडीराम गुंडाजी मोरे, प्रभाकर शंकर मोरे, विजयकुमार श्रीरंग मोरे, नरसिंग मुरलीधर टोम्पे आणि महिला राखीव गटातून कमलबाई पंडित पवार व सुलाबाई जनार्दन मोरे पाटील यांचा समावेश आहे.चलबुर्गा सोसायटी साठी शनिवार दि 24 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीमध्ये मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत मसगे यांनी काम पाहिले तर गट सचिव प्रभाकर माळी यांनी त्यांना सहकार्य केले. जय सहकार ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाल्याबद्दल सर्व सभासद शेतकरी व ग्रामस्थांचे पॅनल प्रमुख बब्रुवान मोरे ,काशीराम परिहार, शिवाजी मोरे यांनी अभिनंदन केले आहे
0 Comments