औसा कैफेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील जमाल नगर तलाव परिसर गार्डन येथे दिनांक 24 डिसेंबर 2021 शुक्रवार रोजी औसा नगरपरिषदेच्या वतीने औसा कैफेचा भव्य उद्घाटन सुलेमान अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी औसा कैफे च्या भव्य उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांचा सत्कार बाबा काझी यांनी केले. उद्घाटन प्रसंगी फहाद अरब,माजी नगराध्यक्ष जावेद शेख,पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव, आरोग्य सभापती मेहराज शेख, उपगराध्यक्षा सौ किर्ती बाई कांबळे,माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी, नगरसेवक साजीद काझी, रुपेश दुधनकर,समाजसेवक मारुफ शेख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला ईलहाज पटेल, दिलावर तत्तापुरे,मुसद्दीक अन्सारी,मजहर खोजन,अदनान काझी,सलीम शेख,मुजम्मील कुरेशी, रब्बानी कुरेशी यांनी या औसा नगरपालिकेच्या वतीने औसा कैफेचा भव्य उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते.
0 Comments