स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बोरगावच्या शाळेत स्पर्धा संपन्न

 स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बोरगावच्या शाळेत स्पर्धा संपन्न


औसा (सा.वा.)दि.२९

 जि प प्रा शा बोरगाव (न) ता औसा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध गुणदर्शन ,वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .  वासुदेव , श्रीकृष्ण, भगतसिंग, ज्योतीबा फुले , सावित्रीबाई फुले ,राणी लक्ष्मीबाई  अशा अनेक वेशभूषेत विद्यार्थ्यी आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बालाजी साळुंके उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक  चंद्रकांत मोटे , बाबासाहेब भिसे  चांबारगे  , म्हेत्रे  , लोकरे , चंद्रकांत  गिरी, श्रीमती म्हेत्रे   आदी जण यावेळी  उपस्थित होते.    

या कार्यक्रमासाठी गावातील अनेक लहान थोर मंडळी यांनी उपस्थीत रहावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर गोमारे  यांनी केले तर आभार   सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती म्हेत्रे यांनी केले.

Post a Comment

0 Comments