औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

 औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन



लातूर दि. २९.


    औसा  तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघा मार्फत होत आहे . तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम खरेदी विक्री संघ करीत असून औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघाच्या  २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  बुधवारी राज्याचे माजी मंत्री  दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते  आशियाना निवासस्थानी करण्यात आले. 


 याप्रसंगी दिलीपराव देशमुख साहेबांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले . कार्यक्रमास  औसा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष सोमवंशी,उपाध्यक्ष शेखर चव्हान, औसा बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत राव  बाजूलगे , मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे , खरेदी - विक्री संघाचे संचालक मनोज सोमवंशी , गणेश माडजे , संताजी होळकर , मारूती मगर , राजीव कसबे , श्रीधर साळुंके , योगेश गोरे , केशोर भोसले , गणेश जाधव , सुरेश मुसळे , बालाजी देशमुख , नागेश कोळपे , गणेश क्षिरसागर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments