विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना औशात दंड

 विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना औशात दंड


 औसा प्रतिनिधी 

औसा शहरामध्ये ओमायक्रोन रुग्ण सापडला असल्याने खळबळ उडाली मराठवाड्यातला पहिला रुग्ण औसा शहरात सापडल्यामुळे संपूर्ण औसा तालुक्यात घबराट पसरली असून महसूल आणि नगरपरिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने ही धडक मोहीम हाती घेत औसा शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारून समज देण्यात

 दिनांक 13 डिसेंबर रोजी औसा शहरात एक रुग्ण सापडल्यामुळे 14 डिसेंबर पासून तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक प्रदीप पाटील, स्वच्छता निरीक्षक महमूद शेख यांनी औसा येथील अॅप्रोच रोड चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी 200 शे रुपये प्रमाणे 12 हजार 700 रुपये दंड वसूल केला. जीप ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणारे प्रवासी तसेच मोटारसायकल व पाई फिरणाऱ्या नागरिकाकडून मास्कचा वापर न केल्याबद्दल दंड वसूल केला. औसा शहरामध्ये पुन्हा ओमायक्रोन मुळे प्रशासनाने दक्षता घेत नागरिकांना समज देऊन आरोग्य सेतू ॲप नियमाचे पालन करण्यासाठी सक्त ताकीद देण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments