औसा नगरपालिकेवर आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा

 औसा नगरपालिकेवर आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा


औसा प्रतिनिधी

औसा शहरातील सर्व नगरवासियांना एक दिवसा आड पाणी पुरवठा करावा, मौजे बिलाल नगर,समता नगर, हाश्मी नगर,बरकत नगर,होळकर नगर या या विभागातील रस्ता,गटारीचे व लाईटचे काम लवकरात लवकर करावे.बिलालनगर पश्चिम एरियामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी व रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवावे या मागणीसाठी आज दिनांक 13 डिसेंबर 2021सोमवार रोजी आम आदमी (आप) पार्टी औसाच्या वतीने नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काडून निवेदन सादर केले.या निवेदनात सविस्तर वृत्त असे औसा शहर वासियांना 15 दिवसा आड पिण्याच्या पाण्याचा नगरपरिषदे मार्फत पुरवठा होत आहे.तोही वेळेवर होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना दुर वरुन पाणी आणावे लागत आहे.सध्या बिलाल नगर,कादरी नगर,समता नगरचा काही भाग, हाश्मी नगर, बरकत नगर, होळकर नगर येथे पाहण्याकरिता शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे.याबाबतीत तात्काळ दखल घेऊन शहरवासीयांना एक दिवसा आड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.सध्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने एक दिवसा आड पाणी पुरवठा करावा.या विभागातील रस्त्याचे अर्धवट कामे तात्काळ वेळेत पूर्ण करण्यात यावे.

बिलाल नगर पश्चिम भागातील हनुमान परिसरातील नागरिकांना आतापर्यंत रस्ता,पाणी,गटारिची सोय,विजेची सोय उपलब्ध नाही.एम आय डी परिसरातील बरेचशे पाणी या परिसरातून जात असल्याने येथील नागरिक पावसाळ्यात जिव मुठीत धरून जगत आहेत.सदरील या ठिकाणी नगरपरिषदे मार्फत रस्त्याची सोय,विज गटारीची सोय तात्काळ दखल घेऊन या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यात यावा.या विभागातील कामे करण्यासाठी काही अडचणी असतील तर मुख्याधिकारी यांना शासन स्तरावर वायू वेगाने प्रयत्न करुन कामाचे अंमलबजावणी करावी.व येथील नागरिकांना तात्काळ न्याय द्यावा..असे न केल्यास यापुढेही आंदोलन नगरपरिषद समोर उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख, उपशहाराध्यक्ष अली कुरेशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या आक्रोश मोर्चात बिलाल नगर,बरकत नगर,हाश्मी नगर समता नगर येथील नागरिक व महिला हातात रिकाम्या घागरी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments