आदिल शेख मित्र मंडळाच्या वतीने कोरोना लसीकरण

 आदिल शेख मित्र मंडळाच्या वतीने कोरोना लसीकरण

  औसा प्रतिनिधी 

औसा येथील आदिल शेख मित्र मंडळाच्या वतीने आणि औसा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष फहिम शेख यांच्या प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम एक डिसेंबर रोजी राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 276 मुस्लिम महिला व पुरुष यांनी नोंदणी केली होती 276 पैकी 240 लाभधारकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस उस्फूर्तपणे घेतली आरोग्यमंत्री प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव, आरोग्य सहाय्यक बबन लोहार, श्रीनिवास मुदगडे, नदीम सिद्दीकी आदि प्रयत्नशील होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद शेख,  मुन्ना चाऊस, मिनाज इनामदार, हर्षद चाऊस, मुजेर इनामदार 


अखिल शेख, अर्शद कुरेशी, खाजा शेख यांनी कोरोना लसीकरणाची नोंदणी व लसीकरणानंतर लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यासाठी उस्फुर्त सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments