बोरफळ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

 बोरफळ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस






बोगस ग्रामसभा घेउन राजकीय व्देषापोटी रोजगार सेवकास काढण्याचा घेतला होता ठराव



ग्रामसेवकांची मनमानी कारभार


औसा प्रतिनिधी


‌ राजकीय व्देषापोटी सरपंच पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करुण ग्रामसभा न घेताच फक्त कागदोपत्री ग्रामसभा दाखवत  ग्रामरोगार सेवक  मधुकर रामदास वाघमारे यांना पदावरून काढून टाकण्यांचा ठराव घेतला होता.याबाबत दैनिकांच्या बातमीतून दि 1/12/2021रोजी राजकीय द्वेषापोटी ग्रामरोजगार सेवकास काढण्यांचा घेतला ठराव अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेत बोरफळ ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राठोड यांनी शासन निर्णय धाब्यावर बसवत बंद खोलीत मोजक्या लोकांच्या उपस्थित

ग्रामसभा घेतल्याने शासन नियमांचे उल्लंघन केले होते.तसे बोगस ग्रामसभा घेऊन काढून टाकण्यांचे निवेदन पंचायत समिती येथे आले होते त्यामुळे ग्रामसेवक राठोड यांना गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी खुलासा मागितला असून  बोगस ग्रामसभा घेणारे ग्रामसेवक राठोड यांच्या वर काय कारवाई होईल हे पहाणे गरजेचे आहे. शासन नियमानुसार रोजगार सेवकांना काढण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून त्यामध्ये त्यांचे मत जाणून घेऊन निर्णय घेण्यांचा नियम असताना स्वतः अधिकारीच बोगस गिरी करून कागदोपत्री मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन निर्णय व ठराव घेत असतील तर गावाच्या विकासाला नक्कीच आडथळा निर्माण होईल. त्यामुळे अधिकारी यांनी सरपंच यांच्या हातातील बाहुले न होता नियमानुसार काम केले तरच राजकीय द्वेषापोटी कोणाचाही बळी जाणार नाही.परंतु बोरफळ ग्रामपंचायत मध्ये वाघमारे यांनी तक्रार केली म्हणून प्रकरण बाहेर पडले नाही तर असे बोगस ठराव घेऊन काय काय घोटाळे केले  असतील हे त्यांनाच माहित.... 




Post a Comment

0 Comments