मनरेगा योजने अंतर्गत फळबाग लागवडीसाठी मुदतवाढ
औसाप्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर फळबाग लागवड व वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला असून या योजनेसाठी वृक्ष लागवडीसाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात व शेतातील बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी या योजनेला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती संजना खोपडे उपसचिव नियोजन विभाग रोहयो महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी च्या पत्र का अन्वये प्रसिद्ध केले आहे.
0 Comments