नगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 मधील येलम परिसरात नवीन बोअरवेल चा शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील येलम परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय होत होती. ती गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी आज दिनांक 20 डिसेंबर 2021सोमवार रोजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते एक नारळ फोडून नवीन बोअरवेलचा शुभारंभ करण्यात आला.या बोअरवेलला 280 फुटावर अडीच ते तीन इंची पाणी लागल्याने येथील येलम परिसरातील नागरिकांचा कायमचा पाण्याचा प्रश्न मिटविला.या बोअरवेलच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक साजीद काझी, पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव, वकील इनामदार,उमर पंजेशा,मलवाड,बाबु चौधरी,आदि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.प्रभाग क्रमांक 5 मधील येलम परिसरातील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविल्या बद्दल नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांचा सत्कार करुन आभार मानले.
0 Comments