शिक्षकांच्या आँफलाईन बिलासाठी मंजूर 1 कोटी निधीचा वित्तप्रेषण आदेश पं.स.औसाला स्वतः आणून देऊन तात्काळ आँफलाईन देयके वाटपाबाबत BDO औसा यांना औसा शिक्षक संघाचा पाठपुरावा
....औसा पं.स.ला वित्तप्रेषण आदेश अद्याप प्राप्त झाला नव्हता. आज श्री.खिचडे सर यांनी आदेश जि.प.कडून प्राप्त करून घेऊन BDO औसा व पंस.लिपिक यांच्याकडे दाखल करून केली चर्चा.
मा.बी.डी.ओ.साहेबांनी शिक्षण विभाग औसा यांना तात्काळ बीले सादर करण्यासाठी केल्या सुचना
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा औसाचे तालुका अध्यक्ष श्री.महादेवजी खिचडे सर व जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजयजी जगताप सर यांनी आज दि.29/12/2021 रोजी औसाचे गटविकास अधिकारी मा.सूर्यकांतजी भूजबळ साहेब यांची* औसा शिक्षण विभागातील गेल्या 10 महिण्यापासून प्रलंबित देयकासाठी वित्त विभाग लातूर यांनी दि.9/12/2021 रोजी औसा तालुक्यासाठी पाठविलेल्या 1 कोटी निधीचे वित्तप्रेषण निवेदनासोबत देऊन तात्काळ वितरणाबाबत सविस्तर चर्चा केली. पंस.औसाला अद्याप वित्तप्रेषण आदेश प्राप्त न झाल्यामुळे औसा पंस.शिक्षण विभागातील प्रलंबित बीले वाटपास उशीर झाल्यामुळे आज औसा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री.खिचडे सर यांनी वित्तप्रेषण आदेश मा.बी.डी.ओ साहेब व पंस.मधील लिपिक मा.भोकरे साहेब यांच्याकडे दाखल केले. लागलीच मा.भूजबळ साहेब यांनी पं.स.चे वरिष्ठ लिपिक श्री.भोकरे साहेब यांना पं.स.शिक्षण विभाग औसा यांच्याकडून दाखल जेष्ठतेनुसार तातडीने बिले सादर करण्यासाठी/मागवून घेण्यासाठी सुचना केल्या.*शिक्षण विभाग औसा येथील श्रीम.कल्याणी मँडम यांनी उद्या बी.डी.ओ साहेब यांच्याकडे बीले सादर करण्यात येतील असे सांगितले. येत्या तीन ते चार दिवसात1कोटींची शिक्षण विभागातील प्रलंबित आँफलाईन बिले संबंधीताना प्राप्त होतील.
मा.भुजबळ साहेब व मा.गटशिक्षणाधिकारी साहेबा यांचे शिक्षक संघाच्या वतीने खूप खूप आभार
0 Comments