जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे एसएमसीची स्थापना


 *जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे एसएमसीची स्थापना*

   

          आज दि.२६ नोव्हें.२०२१  रोजी जि.प.प्रा.शा बुधोडा येथे शालेय प्रांगणात  घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मुबंई हल्ल्यातील शाहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

         कोविड: १९ चे सर्व नियम पाळून "नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे" पुनर्गठन" आरटीई २००९ च्या कलम २१ नुसार सर्व निकषांचे पालन करून लोकशाही पध्दतीने करण्यात आले.

          एस.एम.सी.चे नूतन अध्यक्ष श्री.अमरदीप कांबळे  तर उपाध्यक्ष श्री. सतीश चलवाड यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.घंटे सर,शिक्षणतज्ञ श्री राम आलगुले, शिवराम सुरवसे,सचीन कांबळे, संजय पाटील,सुरेखा पवार,रुपाली मगर,गंगा सूर्यवंशी,शीतल भुत्ते,सुनीता पंडगे,समिना शेख,आर्चना चौगुले..... अशा सतरा जणांची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली.

    यावेळी सर्वच माजी अध्यक्ष सदस्याचा यथोचित सत्कार  करून निरोप देण्यात आला. नूतन अध्यक्षानी शाळेस ऑनरॉइड टीव्ही तर उपाध्यक्षांनी हॅंडवॉशस्टेशन बांधुन देण्याचे जाहीर केले. इतरही सर्व सदस्यांनी शाळेसाठी हवे ते सहकार्य करू असे सांगीतले.

सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

        यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत कांबळे मॅमनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.युवराज घंटे यांनी केले. या सुंदरशा कार्यक्रमाची आभार मानून श्री.नरेश थोरमोठे यांनी सुंदर सांगता केली.

Post a Comment

0 Comments