बेलकुंड शालेय समितीच्या अध्यक्षपदी विलास तपासे यांची निवड

 बेलकुंड शालेय समितीच्या अध्यक्षपदी विलास तपासे यांची निवड औसा प्रतिनिधी  27 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला बेलकुंड प्रांगणात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. हे पुनर्गठन सर्व पालकांनी हात वर करून सदस्यांची निवड करण्यात आली एकूण 11 सदस्यांची निवड करण्यात आली.त्या सदस्यांमधून मतदान घेऊन अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. या अध्यक्ष पदाच्या निवडीत विलास तपासे यांना सर्वाधिक मते मिळाली त्यामुळे त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष माधुरी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी सदस्य म्हणून कैलास कांबळे, मुक्ता कोळी, कोमल निकते, राम माने, गोविंद वगरे, आफरिना पठाण, सुजाता शिंदे, खंडू उबाळे, यांची पालकातुन हात वरी करून निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक किरण पाटील यांनी कार्य केले.त्यावेळी सरपंच विष्णु कोळी, उपसरपंच सचिन पवार, पोलीस पाटील व्यंकट साळुंके, तंटामुक्त अध्यक्ष शकील शेख शिवाजी माने, गणेश यादव, महमंद पठाण, नाना निकते सोसायटीचे व्हाईस चेअरमन संतोष हलकरे, रघुनाथ पवार, निवृत्ती पवार, सतीश गायकवाड, हणमंत करसुळे आदी पालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments