आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे औसा येथे आयोजन

 आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे औसा येथे आयोजन औसा प्रतिनिधी 


औसा येथील माऊली प्रतिष्ठान च्या वतीने आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे आयोजन दि 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी श्री मुक्तेश्वर देवस्थान उंबडगा रोड औसा येथे करण्यात आले आहे. या 2 दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत होणार असून आचार्य भातखंडे संगीत समारोह चे हे 10 वे वर्ष आहे.औसा तालुक्याचे भूमिपुत्र संगीतकार शिवरुद्र स्वामी यांच्या प्रयत्नाने आचार्य भातखंडे संगीत समारोहाच्या माध्यमातून संगीत प्रेमी नागरिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम संगीतकार यांची मेजवानी मिळत आहे. दैनंदिन जीवनातील आपला ताण-तणाव कमी व्हावा आणि आपल्या मनाला संगीत समारोहाच्या माध्यमातून आत्मशांती लाभावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य संगीत समारोह कार्यक्रमांमध्ये तबला, सोलो पंडित राम बोरगावकर ,गणेश बोरगावकर आणि स्वरित पांचाळ तर शास्त्रीय गायन किशोरी मुरके झरीकर , सूरमणी भुजंग मुरके झरीकर , शिवरुद्र स्वामी यांची मेजवानी मिळणार असून या संगीत समारोहामध्ये पंडित दीपक लिंगे हे हर्मोनियम सोलोच्या माध्यमातून साथ-संगत करणार आहेत व पं. विठ्ठलराव जगताप यांचे शास्त्रीय गायन होणार आहे .अशी माहिती रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी माऊली संगीत विद्यालय औसा येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी शिवरुद्र स्वामी, शिवाजी भातमोडे, नरसिंग राजे कुंभार, हनुमंत लोकरे, अड श्याम कुलकर्णी, गजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.औसा तालुक्यातील संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून रसिकांनी या कार्यक्रमाचा हजारोच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सुनील चेळकर, व्यंकट राऊतराव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments