औसा येथे आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन

 औसा येथे आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन


औसा प्रतिनिधी

औसा येथे तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 29 नोव्हेंबर 2021सोमवार रोजी आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांनी लातूर शहरातील येणारी निवडणूक नगरपरिषदेची आहे.त्यामध्ये औसा शहरांमध्ये आम आदमी पार्टी निवडणूक पूर्णपणे ताकदीने उतरून निवडणूक लडविण्यास तयार आहे.सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ज्यामध्ये स्वच्छता असतील, पाणीपुरवठा असेल,रस्त्याचे प्रश्न असतील ,लाईट चे प्रश्न असतील या मुद्यावर आम आदमी पार्टी निवडणूक लढविणार आहे.आणि आम्हाला जनतेतून पूर्ण प्रतिसाद मिळत आहे.असे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.यावेळी औसा तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख, मिडीया प्रमुख मुख्तार मणियार,अमीत पांडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष व लातुर शहराध्यक्ष औसा उपशहाराध्यक्ष अली कुरेशी, सय्यद अमीर सहसचिव यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी अॅड भाऊराव सगट, अॅड काटे हिप्परगा, अॅड फडणीस, अॅड शिवलकर भादा, अॅड कुसुमकर, अॅड श्री पी बिराजदार ,अॅड हर्षद जाधव, शिंदे गंगापूर लोहारा, शेख मुजीब नजीरमिया, पठाण हाफीज सरदारखॉ,शेख मुजम्मील मुबारक,हाफीज मोहम्मद समीर,शेख बाबर, शेख कासीम आदि उपस्थित होते.यावेळीआम तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने आभार मानले

Post a Comment

0 Comments