श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक 27 नोव्हेंबर 2021 शनीवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा ना अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे हा कारखाना पुन्हा सुरू करता आला याचे समाधान आहे,असे सांगून आगामी काळात कारखान्याचा विस्तार करून गाळप क्षमता वाढवली जाईल.
वीज,इथेनॉलसह इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारले जातील. या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला जाईल असे आश्वासनही मा ना अमितभैय्या देशमुख यांनी यावेळी बोलताना दिले. या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड श्रीपतराव काकडे,राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे,गणपत बाजुळगे,श्याम भोसले, सर्जेराव मोरे, रविंद्र काळे,विजय देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments