*गाडवेवाडी येथे घरोघरी जावून कोव्हिड लसीकरण*
*जवळपास 96 टक्के लसीकरण पुर्ण*
औसा प्रतिनिधी:-
औसा तालुक्यातील मौजे गाडवेवाडी येथे कोव्हिड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले असून वृध्द, अपंग व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून दि. 25 नोव्हेंबर रोजी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.25 नोव्हेंबर रोजी जवळपास 76 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोव्हिड-१९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य केंद्र लामजना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक सानप ,डॉ संदीप पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाडवेवाडी ता . औसा येथे आता पर्यंत पाच टप्प्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली असून दि.25 नोव्हेंबर २०२१ रोजी लसीकरणाच्या पाचव्या टप्प्यात गाडवेवाडी येथे वृध्द व अपंग व्यक्तींची गैरसोय होऊ नये, ते लसीकरणापासून वंचित राहु नये म्हणून आरोग्य सेविका मंगल मुसांडे, वैद्यकीय कर्मचारी एच ए पवार, शिक्षक पी एस चव्हाण ,आशा कार्यकर्ती नंदिनी गाडवे,
ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे,
अंगणवाडी सेविका छबाबाई खरोसे, लताबाई कांबळे, शिवप्रसाद चिवरे , अक्षय गाडवे ,विकास भारती ,आदींनी घरोघरी जावून लसीकरण मोहीम यशस्वी केली. गावात आता पर्यंत जवळपास ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले .
0 Comments