हज़रत महेदी माऊद (अ.स.) यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी

 हज़रत महेदी माऊद (अ.स.) यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी


औसा प्रतिनिधी

  महेदवीया जमाअ्त चे संस्थापक इमामूना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद यांच्या जयंती निमित्त इस्लामिक कॅलेंडर तारखेनुसार दरवर्षी १४ जमादिल अव्वल (यावर्षी १९ डिसेंबर २०२१ रविवारी येत आहे) रोजी महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी देण्याची घोषणा करावी, आणि दरवर्षी या तारखेला सुट्टी देण्यात यावी. अशी मागणी औसा महेदवी समाजाच्या वतीने  औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिनांक 24 नोव्हेंबर 2021 बुधवार रोजी मागणीचे निवेदन सादर केले आहे .या मागणीचे सविस्तर वृत्त असे

 इमामूना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद यांच्या जयंतीसाठी महाराष्‍ट्रात सुट्टी जाहीर करावी. महेदी ए माऊद (अ.स.) अल्लाह चे ख़लीफा आणि मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे अनुयायी होते. तरी त्यांच्या जन्मदिनी पर्यायी सुट्टी म्हणून १४ जमादिल अव्वल रोजी दरवर्षी इस्लामिक कॅलेंडर नुसार सुट्टी देण्यात यावी. इमामूना महेदी ए माऊद यांचा जन्म १४ जमादिल अव्वल ८४७ हिजरी (इ.स.१४४३) मध्ये भारताच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे सोमवारी झाला होता. त्यांचा विख्यात वंश हज़रत अली (र.अ.) आणि हज़रत बीबी फातिमा (र.अ.) पर्यंत शोधला जाऊ शकतो. त्यांचे ९१० हिजरी (इ.स.१५०६)  वयाच्या ६३ व्या वर्षी अफ़गानिस्तान येथील फ़राह येथे निधन झाले. ज्यांनी हज़रत सय्यद मुहम्मद जौनपुरी इमामुना महेदी माऊद (अ.स.) चे अनुयायित्व स्विकारले त्यांना मुस्लीम महेदवी समुदाय म्हणतात. मुस्लीम महेदवी समाज महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यात बहुसंख्येने वास्तव्यास आहे. तसेच पाकिस्तान, अफ़गानिस्तान, तुर्कस्तान, अझरबैजान आणि इराणसह अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आदी पाश्चिमात्य देशात सुद्धा मुस्लीम महेदवी आढळतात. महाराष्ट्र  राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, अहेमद नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, अकोला आदी  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महेदवी समुदाय राहतो. या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महेदवीया समुदायाचे लोक, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात महेदवीया समाजाचे मोठे योगदान आहे. तसेच महाराष्ट्रातील अहेमदनगर जिल्ह्यातील दर्गाह दायरा येथील सुप्रसिद्ध दर्गाह हज़रत शाह शरीफ (र.अ.) हे मुस्लीम महेदवीया समुदायाचे होते आणि ते हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद (अ.स.) यांचे शिष्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची अशी श्रद्धा होती की, अहेमदनगर येथील हज़रत शाहशरीफ यांच्या दर्शनामुळे आशीर्वाद मिळाल्याने त्यांना दोन मुले झाली. ज्यांची नावे  हज़रत शाह शरीफ़ यांच्याच नावावर अनुक्रमे शाहजी आणि शरीफ़जी अशी ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे शेकडो वर्षांपूर्वी चा ऐतिहासिक पुरातन इतिहास असलेल्या इमामूना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद यांच्या जयंती निमित्त इस्लामिक कॅलेंडर नुसार १४ जमादिल अव्वल या तारखेला शासकीय सुट्टी महाराष्ट्र राज्यात जाहीर करावी आणि दरवर्षी ती  देण्यात यावी अशी मागणी करून नमूद केले आहे की, भारतातील तेलंगाना राज्य सरकारने इ.स. २०१८ सालापासून इस्लामिक कॅलेंडर नुसार १४ जमादिल अव्वल रोजी शासकीय सुट्टी जाहीर केलेली असून दरवर्षी तिथे शासकीय सुट्टी दिली जाते. असे औसा महेदवी समाजाचे अध्यक्ष अ.गणीकरपुडे,म.मुस्लीम कबीर,खुंदमीर मुल्ला,भिकन मुंगले,मन्नान मुंगले,नियामत लोहारे, अॅड तमीम लोहारे,नदीम सय्यद,अ.रशीद करपुडे, मुख्तार मणियार महंमद मुंगले आदि महेदवी समाजाचे बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments