उस्मानाबाद जनता बँक निवडणूक ..औशात ४८ टक्के मतदान

 उस्मानाबाद जनता बँक निवडणूक ..औशात ४८ टक्के मतदान
औसा (  प्रतिनिधी ) उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी औसा येथील पाच मतदानकेंद्रावर एकूण ४८ टक्के मतदारांनी मतदान केले आहे .  आज १९  नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले औसा येथील मुक्तेश्वर विद्यालय येथील पाच मतदान केंद्रावर   दोन हजार ६७६ मतदारांपैकी एक हजार ३७५  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . तर किल्लारी येथील मतदानकेंद्रावर  एक  हजार ४०० पैकी आठशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .

 नागदे -  मोदानी - शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आणि  कर्मचारी परिवर्तन पॅनल या दोन पॅनल मध्ये  लढत झाली .

१९  नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले औसा  येथील पाच मतदान केंद्रावर  दोन्ही पॅनलच्या वतीने मतदारांना मतदान केंद्रावर मतदार यादीतील नंबर काढून देणे व मतदान करण्यासाठी कार्यकर्ते व समर्थक       सहकार्य करीत होते .

Post a Comment

0 Comments